Breaking News

नगरसेवक तेजस कांडपिळे यांना पितृशोक

पनवेल : प्रतिनिधी

पनवेल महापालिकेचे नगरसेवक तेजस कांडपिळे यांचे वडील जनार्दन कृष्णाजी कांडपिळे यांचे वयाच्या 67व्या वर्षी शनिवारी (दि. 25) रात्री 8 वाजता निधन झाले. त्यांच्यावर रविवारी (दि. 26) पोदी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, एक मुलगी असा परिवार आहे. फुल माळी समाज पोदी ट्रस्टचे सभासद व पोदी येथील ज्येष्ठ मार्गदर्शक असणार्‍या जनार्दन कांडपिळे यांच्या अंत्ययात्रेच्या वेळी आमदार प्रशांत ठाकूर, सभागृह नेते परेश ठाकूर यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी, कार्यकर्ते, पोदी येथील नागरिक उपस्थित होते. कै. जनार्दन यांचा दशक्रिया विधी मंगळवार 4 जानेवारी 2022 रोजी सकाळी 9 वाजता पोदी स्मशानभूमी येथे, तर उत्तरकार्य शुक्रवार 7 जानेवारी 2022 रोजी पोदी येथील घरी होणार आहे.

Check Also

पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …

Leave a Reply