Breaking News

टीम इंडियाची मिल्खा सिंग यांना अनोखी आदरांजली

लंडन ः वृत्तसंस्था

भारत-न्यूझीलंड यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना साऊथम्प्टन येथे खेळला जात आहे. भारताचे महान धावपटू मिल्खा सिंग यांचे शुक्रवारी (दि. 18) निधन झाले. मिल्खा सिंग यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी टीम इंडियाचे खेळाडू हातात काळ्या रंगाचे आर्मबँड घालून मैदानात उतरले. कोरोनाशी झुंज देणार्‍या मिल्खा सिंग यांनी वयाच्या 91व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला. त्यांचा जन्म 20 नोव्हेंबर 1929 रोजी पाकिस्तानातील पंजाबमध्ये झाला. 1958च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील 200 व 400 मीटर प्रकारात त्यांनी सुवर्णपदक जिंकले होते.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply