Breaking News

सीकेटी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय परिषद

 

मान्यवरांची उपस्थिती; इंग्रजी भाषा विषयावर विचारमंथन
पनवेल : रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर (सीकेटी) आर्ट्स, कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स (स्वायत्त) महाविद्यालयात इंग्रजी विभाग आणि इंग्लिश लँग्वेज टीचर्स असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने 8 ते 10 डिसेंबर या कालावधीत इंडिअन इंग्लिश लँग्वेज टीचिंग : इमिटेटिव्ह ऑर जनरेटिव्ह या विषयावर तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेचा उद्घाटन समारंभ गुरुवारी (दि. 8) झाला. या वेळी उपस्थित जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी महाविद्यालयाचे कौतुक केले.
प्रो. डॉ. रजनीश कामत, कुलगुरू, होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटी, जेरी पिंटो, ख्यातनाम कादंबरीकार आणि जोबर्ट इ. अबुवा, कार्यकारी संचालक, इंगिल्श भाषा कार्यक्रम, न्यू जर्सी, अमेरिका हेदेखील या वेळी उपस्थित होते. या वेळी जेरी पिंटो यांनी भाषा ही अनुकरणशील किवा सृजनशील असते, असे मत मांडले. या परिषदेचा सामारोप समारंभ शनिवारी (दि. 10) झाला. या वेळी प्रसिद्ध सिनेअभिनेते अन्नू कपूर हे प्रमुख पाहुणे लाभले होते.
या आंतरराष्ट्रीय परिषदेचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. एस. के. पाटील, आयक्यूएसी समन्वयक डॉ. बी. डी. आघाव, रुसा समन्वयक डॉ. एस. एन. वाजेकर यांनी शुभेच्छा दिल्या. तसेच महाविद्यालयातील सर्व विद्याशाखांचे प्रमुख, विविध विभागाचे प्रमुख आणि सर्व प्राध्यापक वर्गाने या परिषदेच्या यशस्वी आयोजनाबद्दल शुभेच्छा दिल्या. या परिषदेच्या यशस्वी आयोजनासाठी इंग्रजी विभागाचे प्रमुख डॉ. आर.व्ही. येवले, प्रा. एस. एन. परकाळे, प्रा. आर. आर. आगलावे, प्रा. ए. एम. शिंगोटे, प्रा. ए. एम. हिरे तसेच इएलटीएआय सचिव डॉ. के. इलँगो, सहसचिव डॉ. रामकृष्णन भिसे, मुंबई विभाग अध्यक्ष डॉ. सचिन भुंबे तसेच महाविद्यालयातील इतर प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी यांनी विशेष परिश्रम घेतले.
या परिषदेचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, आमदार प्रशांत ठाकूर आणि सचिव डॉ. एस. टी. गडदे यांनी आयोजकांचे कौतुक केले.

Check Also

कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेलमध्ये विकासकामांचा झंझावात

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट व लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून …

Leave a Reply