Breaking News

देशहिताचा विचार करून मतदान करा

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे आवाहन; रावे येथे सभा

पेण : प्रतिनिधी

नात्यागोत्यापेक्षा देश महत्त्वाचा असल्याने प्रत्येक नागरिकाला देशहितासाठी मोदी सरकार पुन्हा निवडून देणे गरजेचे आहे, यासाठी रायगड जिल्ह्याकरिता आपणा सर्वांनी निष्कलंक असा अनंत गीतेंसारखा खासदार निवडून द्या, असे आवाहन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी बुधवारी (दि. 17) पेण रावे येथे झालेल्या जाहीर सभेत केले.

भाजप, शिवसेना, रासप, आरपीआय, शिवसंग्राम महायुतीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारार्थ रावे येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला माजी मंत्री रवीशेठ पाटील, जिल्हा सरचिटणीस भाई विष्णू पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख किशोर जैन, लोकसभा विस्तारक अविनाश कोळी, भाजप जिल्हा प्रवक्ते मिलिंद पाटील, माजी जि. प. विरोधी पक्षनेते वैकुंठ पाटील, माजी  जि. प. सदस्या कौसल्या पाटील, जिल्हा सरचिटणीस बंडू खंडागळे, तालुका अध्यक्ष गंगाधर पाटील, कामगार सेल अध्यक्ष विनोद शहा, विस्तारक पंकज शहा, निरीक्षक सुनील नाईक, रावे सरपंच मीनाक्षी तावरी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

या वेळी बोलताना पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितले की, रावे गाव हे पूर्णपणे रवीशेठ पाटील यांच्या पाठीशी आहे. त्यांनी या गावामध्ये अनेक विकासकामे केली व अजूनही या मतदारसंघात विकासकामांच्या समस्या सुटलेल्या नसल्यामुळे त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपत प्रवेश केला. या तालुक्यात   विकासकामे होणे गरजेचे

आहे. या रावे गावासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मी स्वतः निधी दिलेला असून खर्‍या अर्थाने कामाला सुरुवात झालेली आहे, असे ते म्हणाले.

या वेळी माजी मंत्री रवीशेेठ पाटील यांनी सांगितले की, आज या व्यासपीठावर तीन विधानसभेचे उमेदवार एकत्र आले आहेत त्यांची बेरीज एक लाख 25 हजार होते विरोधकांची 74 हजार होते, तर कोणाची आघाडी जास्त. ज्या पूर्व विभागात 1820 बुथ कॅप्चर करून मतदान होते त्या ठिकाणीही आता आपण पुढे जाणार आहोत.

या वेळी बोलताना माजी मंत्री रवीशेठ पाटील यांनी या रावे गावाने मला भरभरून दिले. त्यामुळे आपण या ठिकाणी अनंत गीते यांना जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून आणणार आहोत. केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार येणार असून आपण आपल्या गावचा विकास, तालुक्याचा विकास या मतदारसंघाचा विकास या नेत्याच्या माध्यमातून करून घेऊ या व अनंत गीते यांना जास्तीत जास्त मतांनी निवडून द्या, असे त्यांनी आवाहन केले.    शिवसेना जिल्हाप्रमुख किशोर जैन यांनी अनंत गीते यांना मतदान करून जास्तीत जास्त मताधिक्य देऊ या, असे आवाहन या वेळी केले. या वेळी शेकापचे जनार्दन पाटील यांनी आपल्या सहकार्‍यांसमवेत  भाजपत प्रवेश केला.

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply