Breaking News

पूरग्रस्तांना तहसील कार्यालयाकडून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

कर्जत : प्रतिनिधी

दि. 21 जुलै व दि. 22 जुलै रोजी अतिवृष्टीमुळे कर्जत तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पुराच्या पाण्याने नुकसान झालेल्या नागरिकांना तहसील कार्यालयाच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

दोन दिवस सतत पडणार्‍या पावसामुळे कर्जत तालुका जलमय झाला होता, तालुक्यात अनेक घरांमध्ये पाणी घुसल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कर्जत नगर परिषद क्षेत्रात कर्जत न्यायालय परिसर, इंदिरानगर, बामचा मळा, कोतवाल नगर मधील म्हाडा कॉलनी, विठ्ठलनगर मधील सत्यम अपार्टमेंट, निलेश अपार्टमेंट, चंदन अपार्टमेंट, मुद्रे येथील शिवम कॉम्लेक्स, नेमिनाथ रेसिडन्सी, नानामास्तर, सिद्धार्थ नगर ज्ञानदीप सोसायटी या परिसरातील नागरिकांच्या घरात पाणी शिरले. त्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

मुंबई येथील रहिवासी, मात्र कर्जत तालुक्यात व्यावसायिक असलेले चरणदीप सिंग, त्यांच्या मातोश्री पिंकी सिंग यांनी कर्जत तालुक्यातील पूरग्रस्त परिस्थिती पाहून तहसीलदार विक्रम देशमुख यांना जीवनावश्यक वस्तूचे किट दिले. तहसीलदार विक्रम देशमुख, निवासी नायब तहसीलदार सुधाकर राठोड, मंडळ अधिकारी मिलिंद तिर्‍हेकर, तलाठी दत्ता ठोकळ, तलाठी वैभव आंबोलकर, तलाठी आशीष राऊत, तलाठी अभिजित हिवरकर, कोतवाल सोपान पाटील यांनी बामचा मळा येथील रहिवाशांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप केले.

सिंग परिवाराने आतापर्यंत 100 किट दिले आहेत. ते अजून 300 किट देणार असल्याची माहिती तहसीलदार विक्रम देशमुख यांनी दिली.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply