Breaking News

भाजप किसान मोर्चाकडून शेती आणि शेतीपूरक व्यवसाय मार्गदर्शन

कर्जत : बातमीदार

भारतीय जनता पक्ष किसान मोर्चाच्या वतीने कर्जत येथे नुकतेच शेती आणि शेतीपूरक व्यवसाय मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. कर्जत आणि खालापूर तालुक्यातील शेतकरी या शिबिराला मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांना आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा समन्वयक अंजली पाटील यांनी मार्गदर्शन केले.

शेती आणि शेतीपूरक व्यवसाय करण्यासाठी आण्णासाहेब पाटील महामंडळाकडून अर्थ सहाय्य केले जाते. त्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत, नाव नोंदणी कशा प्रकारे करावी, ऑनलाइन रजिस्ट्रेशन कसे करावे याबाबत अंजली पाटील यांनी उपस्थित शेतकर्‍यांना माहिती दिली.

भाजप किसान मोर्चाचे कोकण प्रदेश संघटक सुनिल गोगटे आणि भाजप जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे यांनीही या वेळी विविध शासकीय योजनाबाबत  शेतकर्‍यांना मार्गदर्शन केले. किसान मोर्चाचे तालुका अध्यक्ष शिरीष कदम यांनी शिबिराचे सूत्रसंचालन केले.

कर्जतचे उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, भाजप तालुका सरचिटणीस संजय कराळे, तसेच विजय कुलकर्णी, मिलिंद खंडागळे, सर्वेश गोगटे आदीसह कर्जत व खालापूर तालुक्यातील शेतकरी या शिबिराला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply