पनवेल : रामप्रहर वृत्त
भारतीय जनता पक्ष कामगार सेलच्या कोकण विभागाची बैठक गुरुवारी (दि. 28) आयोजित करण्यात आली होती. ही बैठक भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात झाली. या बैठकीला कामगार सेलचे प्रदेश अध्यक्ष गणेशभाऊ ताटे, प्रदेश सरचिटणीस तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे उपमहापौर केशव घोळवे, प्रदेश सरचिटणीस प्रमोद जाधव, प्रदेश सचिव संजय पाटील, कामगार आघाडी सोशल मीडिया प्रमुख हनुमंत लांडगे, प्रदेश उपाध्यक्ष श्री. म्हात्रे, देवेंद्रजी चाळके, तुळशीदास दुडे, कोकण अध्यक्ष कामलेश राणे, कोकण प्रभारी विनोद शाह, दक्षिण रायगड अध्यक्ष श्री. पाटील, कामगार सेलचे उत्तर रायगड जिल्हा जितेंद्र घरत, जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर साखरे, जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र कोरडे, जिल्हा उपाध्यक्ष जगदिश म्हात्रे, अरुण घोडके, सुर्यकांत देशमुख, वाशिवली ग्राम पंचायतीचे उपसरपंच सुजाता पाटील, उरण तालुका अध्यक्ष चंद्रकांत कडू, पीयूष ठाकूर यांच्यासह संघटीक व असंघटिक कामगार क्षेत्रातील कामगार वर्ग उपस्थित होते.