Breaking News

माझ्या उत्तम कामगिरीचे श्रेय राहुल द्रविडला

पृथ्वी शॉचा खुलासा

मुंबई ः प्रतिनिधी

टीम इंडियाचा युवा बॅट्समन पृथ्वी शॉ मागील आयपीएलमध्ये अतिशय खराब फॉर्ममध्ये होता. आयपीएलनंतर ऑस्ट्रेलिया दौर्‍यातही तो फेल गेला. त्यामुळे त्याला टीम इंडियातून वगळण्यात आले. यानंतर पृथ्वी शॉने जोरदार खेळ केला आहे. विजय हजारे ट्रॉफीत त्याने सर्वाधिक धावांचा विक्रम केला, तर आयपीएल स्थगित होण्यापूर्वी त्याने 166.49च्या स्ट्राइक रेटने 308 धावा केल्या आहेत. पृथ्वी शॉने आपल्या बदललेल्या फॉर्मचे श्रेय टीम इंडियाचा माजी कॅप्टन राहुल द्रविडला दिले आहे.

पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने अंडर 19 वर्ल्डकप जिंकला होता. त्या टीमचा राहुल द्रविड कोच होता. एका मुलाखतीत पृथ्वीने द्रविडच्या त्या वर्ल्डकपच्या आठवणी सांगितल्या. मी 2008 साली विराट कोहलीच्या टीमने अंडर 19 वर्ल्डकप जिंकताना टीव्हीवर पाहिले होते. त्या वेळी मला ही कोणती स्पर्धा असते हेदेखील माहीत नव्हते. त्यानंतर मला स्पर्धेत टीम इंडियाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. तो खूप आनंदाचा क्षण होता. आम्ही वर्ल्डकप जिंकला. आमची टीम खूप चांगली होती, असे पृथ्वीने सांगितले.

राहुल द्रविडसोबत मी अंडर 19 वर्ल्डकपसह इंडिया टीममध्येही खेळलो. त्यांनी माझ्या बॅटिंगची नैसर्गिक शैलीही बदलली नाही. मी पॉवर प्लेमध्ये खेळल्यास चांगल्या धावा करेन हे त्यांना माहिती होते. नैसर्गिक खेळ करण्याचा द्रविड यांचा सल्ला मला खराब फॉर्ममध्ये कामी आला, असेही पृथ्वी या वेळी म्हणाला.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply