Breaking News

महाड, पोलादपूरातील दरडग्रस्त गावांचे सर्वेक्षण

दोन दिवसांत जिल्हा प्रशासनाकडे सादर होणार अहवाल

अलिबाग : प्रतिनिधी

महाड, पोलादपूरात अतिवृष्टीमुळे दरडी कोसळण्याच्या अनेक घटना घडल्या यानंतर या सर्व गावांची भुवैज्ञानिकांच्या पथकाकडून पाहणी करण्यात आली आहे. दोन दिवसांत ते आपला अहवाल जिल्हा प्रशासनाला सादर करणार आहेत.

अतिवृष्टीमुळे महाड तालुक्यातील तळीये, हिरकणीवाडी येथे तर पोलादपूर तालुक्यातील केवनाळे, साखर सुनातरवाडी, आंबेमाची गावांवर दरडी कोसळल्या यात 95 जणांचा मृत्यू झाला. 26 जण जखमी झाले. या दुर्घटनांची गंभीर दखल घेऊन दरडग्रस्त गावांच्या फेरसर्वेक्षणासाठी भुवैज्ञानिकांना पाचारण करण्यात आले होते. यानुसार भुवैज्ञानिकांची पथके महाड आणि पोलादपूर तालुक्यात दाखल झाली होती. त्यांनी मंगळवारी पोलादपूर येथे तर बुधवारी महाड तालुक्यातील गावांचे सर्वेक्षण केले. तळीये गावालगत असलेल्या डोंगरांची पाहणी केली.

भुवैज्ञानिकांची पथके दोन दिवसांत ही पथके आपला अहवाल जिल्हाप्रसादर करणार आहेत अशी माहिती जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली. हा अहवाल येत नाही तोवर दरडग्रस्त गावांतील नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करण्यात आले आहे. भुवैज्ञानिकांच्या अहवाल प्राप्त झाल्यावर त्यांना गावात परत पाठवायचे अथवा नाही याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

तळीये ग्रामस्थांचे गावातच होणार पुनर्वसन

अलिबाग ः प्रतिनिधी

महाड तालुक्यातील दरडग्रस्त तळीये गावच्या ग्रामस्थांचे त्याच गावात पुनर्वसन केले जाणार आहे. तशा हालचाली सुरू झाल्या आहेत. दरडीमुळे गावात बेघर झालेल्या 15 कुटूंबांसाठी तातडीने तात्पुरत्या स्वरूपात निवारा शेड उभारण्यात येणार आहे

तळीये गावात दरड कोसळून 32 घरे ढिगार्‍याखाली गाडली गेली. या दुर्घटनेत 84 जणांचा मृत्यू झाला आहे. आता या संपूर्ण गावाच्या पुनर्वसनाची मागणी केली जात आहे. जिल्हा प्रशासनाने गावकरी ज्या जागेवर सांगतील त्या जागेवर पुनर्वसन केल जाईल अशी भूमिका घेतली आहे. गावात शासकीय जागा उपलब्ध नसल्याने खासगी जागा संपादन करून गावकर्‍यांचे पुनर्वसन केले जाणार आहे.

तळीये गावात सात वाड्या आहेत. यातील कोंडाळकर वाडी दरडीखाली पूर्ण नष्ट झाली आहे. म्हस्के वाडी, यादव वाडी, बौद्धवाडी, सुतारकोंड या वाड्यांतील साधारणत: 175 कुटूंबांचे सुरक्षित स्थळी पुनर्वसन केले जाणार आहे. गावकर्‍यांच्या पुनर्वसनासाठी 10 हेक्टर जागा हवी आहे. त्यांनी गावतील जागा प्रशासनाला सूचवली आहे. ही जागा खासगी असल्याने ती संपादित करावी लागणार आहे.

दरड कोसळून बेघर झालेल्या 15 कुटूंबांसाठी तातडीने तात्पुरत्या स्वरूपात निवारा शेड उभारण्यात येणार आहे. कंटेनर हाऊस पद्धतीची 15 घरे उपलब्ध व्हावी यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. यात जेएसडब्ल्यू, टाटा स्टील, रिलायन्ससारख्या कंपन्यांची मदत घेतली जात आहे.

गावकर्‍यांचे गावातच पुनर्वसन व्हावे अशी आमची मागणी आहे. त्यासाठी आम्ही जिल्हा प्रशासनाला जागा दाखवली आहे. त्या ठिकाणीच आमचे पुनर्वसन व्हावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

-महेश म्हस्के, उपसरपंच, तळीये ग्रामपंचायत

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply