Breaking News

महाडमध्ये भाजपचे अखंड सेवाकार्य; नेत्यांकडून पाहणी, मदतवाटपाचाही घेतला आढावा

महाड ः रामप्रहर वृत्त

अतिवृष्टीमुळे महाडमध्ये पूर येऊन, तसेच दरड कोसळल्यामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. पूरग्रस्त व दरडग्रस्तांच्या मदतीसाठी या ठिकाणी केंद्र व राज्यातील भाजप नेते व लोकप्रतिनिधींनी तत्काळ धाव घेऊन पाहणी केली, तसेच पूरग्रस्तांना मदत देणे सुरू केले. त्यामुळे महाडकरांना मोठा दिलासा मिळाला. भाजप नेत्यांनी बुधवारीही (दि. 28) महाडमध्ये झालेल्या नुकसानीची पाहणी केली आणि मदतकार्याचा आढावा घेतला. रायगडचे माजी पालकमंत्री तथा विद्यमान आमदार रवींद्र चव्हाण, भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांनी बुधवारी महाडमध्ये जाऊन पाहणी केली. भाजप दक्षिण जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते, सरचिटणीस मिलिंद पाटील, बिपीन महामुणकर, उपाध्यक्ष राजेश मपारा, रोहा तालुका अध्यक्ष सोपान जांबेकर, अलिबाग तालुका अध्यक्ष परशुराम म्हात्रे, तालुकाध्यक्ष जयवंत दळवी, प्रदेश सचिव रवी मुंडे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अमित घाग, पनवेलचे नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील, अजय बहिरा, युवा नेते दशरथ म्हात्रे, डॉ. कृष्णा देसाई, प्रसन्न पालांडे, महिला मोर्चा सरचिटणीस मंजुषा कुद्रीमोदी आदी सोबत होते. या वेळी भाजप नेते, पदाधिकार्‍यांनी महाड शहरात पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली, तसेच भाजपच्या वतीने गुरुकुल येथे सुरू करण्यात आलेल्या कॅम्पला भेट देऊन मदतकार्याचा आढावा घेतला. या ठिकाणाहून पूरग्रस्तांना अन्न, पाण्यासह अन्य मदत केली जात आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने बी. एस. बुटाला सांस्कृतिक भवनात भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. तेथेही भाजप नेत्यांनी भेट दिली. जगताप कुटुंबीयांचे सांत्वन काँग्रेस नेते, माजी आमदार माणिक जगताप यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या कुटुंबीयांचे रायगडचे माजी पालकमंत्री तथा विद्यमान आमदार रवींद्र चव्हाण, भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, दक्षिण जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांनी सांत्वन केले. भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते सोबत होते.

नागरिकांना भोजन

महापूर आणि दरड या अस्मानी संकटातून सावरण्यासाठी भाजपच्या वतीने महाडकरांसाठी मदतीचा ओघ सुरूच आहे. त्या अंतर्गत दररोज सहा हजार नागरिकांची भोजन व्यवस्था करण्यात आली असून बिस्किटे व पिण्याच्या पाण्याची, तसेच इतर आवश्यक व्यवस्थाही आहे. वरिष्ठ नेत्यांच्या निर्देशानुसार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल मनपा स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी भोजन तयार करण्याची जबाबदारी सांभाळत असून त्यांची टीम, तसेच दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते, उपाध्यक्ष राजेश मपारा, सरचिटणीस मिलिंद पाटील, वैकुंठ पाटील, नाना महाले, बिपीन म्हामुणकर महाडमध्ये ठाण मांडून आहेत. ते व इतर पदाधिकारी, कार्यकर्ते गरजूंना भोजन, पाणी व इतर मदत पोहोचवत आहेत.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांना महाराष्ट्र प्रदेश भाजप चिटणीसपदाची मोठी जबाबदारी

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची घोषणा …

Leave a Reply