Breaking News

आदिवासी महिलेवर बलात्कार करून खून; दिघोडेतील घटना

जेएनपीटी : प्रतिनिधी

उरण तालुक्यातील दिघोडे गावाजवळ एका आदिवासी महिलेवर बलात्कार करून तिची गळा चिरून हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. जवळच असणार्‍या कंठवली कातकरवाडी येथील ही महिला असून अनसूया प्रल्हाद कातकरी (32) असे तिचे नाव आहे. उरण पोलीस ठाण्यात याबाबत खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला असून, अधिक तपास सुरू आहे. दिघोडे हायस्कूलच्या पाठीमागे असलेल्या मोकळ्या निर्जन जागेवर या महिलेला मारून टाकले होते. याची खबर रविवारी (दि. 24) संध्याकाळी  उरण पोलिसांना लागल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. विवस्त्र अवस्थेत असलेल्या या महिलेच्या शरीरावर मारल्याच्या खुणा, तसेच गळा धारदार शस्त्राने कापलेला होता. या महिलेवर बलात्कार करून मारून टाकले असण्याचा पोलिसांचा अंदाज आहे. या खूनप्रकरणी उरण पोलिसांनी काही जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या खुनाचा लवकरच तपास लागेल, असा दावा वरिष्ठ निरीक्षक जगदिश कुलकर्णी यांनी केला आहे.

Check Also

पनवेल ग्रामीण भागातील रस्त्यांचा होणार विकास

50 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता; आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणी व पाठपुराव्याला यश पनवेल …

Leave a Reply