Breaking News

पनवेलच्या सोसायटी मित्र मंडळाकडून महाडमधील पूरग्रस्तांना मदत

पनवेल ः रामप्रहर वृत्त

येथील मिडलक्लास हौसिंग सोसायटी मित्र मंडळाच्या वतीने महाडमधील पूरग्रस्तांसाठी जीवनावश्यक वस्तूंची मदत बुधवारी (दि. 28) सकाळी महाडला रवाना करण्यात आली. या सामाजिक उपक्रमाबद्दल माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी सोसायटी मित्र मंडळाचे कौतुक केले. या वेळी मंडळाचे अध्यक्ष सुमित झुंजारराव, रोशन ठाकूर, प्रवीण मोरबाळे यांच्यासह पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. या उपक्रमास नितीन ठाकूर यांचे विशेष सहकार्य लाभले. या मदतीमध्ये 300 रेशन किट, फरसाण, बिस्कीट, साबण, फिनेल, टुथपेस्ट, ब्रश, मेणबत्ती, पाणी अशा जवळपास 21 आवश्यक वस्तूंचा समावेश आहे.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply