Breaking News

बॅ. अंतुले यांना दगा देणार्या तटकरेंना पाडा

नाविद अंतुलेचे भावनिक आवाहन; नागोठणेत महायुतीची प्रचार सभा

नागोठणे : प्रतिनिधी

ज्यांना राजकारणात पुढे आणले त्याच सुनील तटकरे यांनी माझ्या वडिलांच्या पाठीत राजकीय खंजीर खुपसण्याचे काम केले होते. त्यामुळे अशा तटकरेंना येत्या निवडणुकीत पाडा, असे सांगण्यासाठीच आज नागोठण्यात आलो असल्याचे भावनिक आवाहन स्व. बॅ. अंतुलेचे सुपुत्र नाविद अंतुले यांनी केले.

महायुतीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचाराची सभा शुक्रवारी (दि. 19) सायंकाळी उशिरा येथील मुस्लिम मोहल्ल्यात घेण्यात आली, त्यावेळी नाविद अंतुले बोलत होते. या लोकसभा मतदारसंघातील सर्व गावांमधील मोहल्ल्यात फिरलो असून अनंत गीते यांना मुस्लिम बांधवांकडून पाठिंबा मिळत असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला.

यापूर्वी युतीचे सरकार होते तेव्हा जिल्हा परिषदेची निवडणूक लागली होती. त्यावेळी नागोठणेच्या कामत गोविंदा हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीत सुनील तटकरे यांनी रावे मतदारसंघाची मागणी केली होती. त्यावेळी मला हे मान्य न झाल्याने तेव्हा आमची आघाडी तुटली होती. मात्र, नागोठणेकरांच्या मागणीवरून माझी पत्नी, कौसल्या पाटील यांना नागोठणे मतदारसंघात उभी करून त्यांना येथून निवडून सुद्धा आणण्याची किमया साधली होती.

याचा आकस धरून या महाशयांनी विधानसभा निवडणुकीत आपल्या मोठ्या भावाला माझ्या विरोधात उभे करून मला पाडण्याचे काम केले होते, असे सांगून माजी मंत्री रवीशेठ पाटील यांनी, ज्यांनी मला पाडण्याचे काम केले आहे, त्या तटकरेंना पाडण्याची वेळ आता जवळ येऊन ठेपली असल्याचे सांगितले.

आता 23 तारखेला आपण सर्वांनी तटकरेना पाडण्याचे काम करायचे असून त्यात आपण निश्चितच यशस्वी होणार आहोत असे सांगताना रविशेठ पाटील यांनी येणार्‍या काळात काँग्रेस शिल्लकच राहणार नसल्याचे भाकीत केले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख किशोर जैन, मुंबईतील सेनेचे नगरसेवक हाजी अलिम शेख, सुलतान मुकादम, सरपंच डॉ. मिलिंद धात्रक, नौशाद दळवी यांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कीर्तिकुमार कळस यांनी केले.

रोहे पंचायत समितीचे सदस्य संजय भोसले, घिसुशेठ जैन यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मतदार या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सुनील तटकरे यांचे शंभर अपराध आता भरले आहेत. 23 तारखेला अनंत गीते यांना आपले अमूल्य मत देऊन, या भ्रष्टाचार्‍याला गाडा.

-नाविद अंतुले, शिवसेना नेते

Check Also

‘प्रेम नगर’ है यह अपना….

हिंदी चित्रपटाने बायस्कोपपासून ओटीटीपर्यंत, सोळा एमएमपासून सत्तर एम.एम, सिनेमास्कोपपर्यंत, रस्त्यावरच्या पोस्टरपासून ते डिजिटल युगापर्यंत, मोनो …

Leave a Reply