Breaking News

महायुतीच्या पाठीशी महिलाशक्ती

भाजप पदाधिकारी समिधा टिल्लू, मृणाल खेडकर

कर्जत : बातमीदार

देश आणि राज्यातील सरकारने महिलांसाठी राबविलेल्या विविध योजनांमुळे महिला अधिक सक्षम बनल्या आहेत, त्यामुळे मावळ लोकसभा मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मावळा म्हणून आम्ही खासदार श्रीरंग बारणे यांना पुन्हा लोकसभेत पाठवू, असा निर्धार भाजपच्या जिल्हा सरचिटणीस समिधा टिल्लू यांनी नेरळ येथे व्यक्त केला.

शिवसेना-भाजप-आरपीआय महायुतीच्या माध्यमातून नेरळ शहरातील सर्व प्रभागात प्रचार यंत्रणा राबविली जात आहे. महायुतीच्या महिला कार्यकर्त्या घरोघरी जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि खासदार श्रीरंग बारणे यांनी केलेल्या विकासकामांची माहिती देत आहेत. त्यात शिवसेनेसह भाजपच्या महिला कार्यकर्त्या आघाडीवर आहेत.

नेरळच्या खांडा भागात महायुतीच्या वतीने प्रचारफेरी काढण्यात आली होती. त्यात कर्जतच्या माजी नगरसेविका बिनीता घुमरे, महिला कार्यकर्त्या श्रेया वैद्य यांनी सहभाग घेत श्रीरंग बारणे यांना निवडून देण्याचे मतदारांना आवाहन केले. नेरळमधील महिला कार्यकर्त्यांनीही घराघरात जाऊन महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांचा प्रचार केला. त्यावेळी भाजपच्या जिल्हा सरचिटणीस समिधा टिल्लू, भाजप महिला मोर्चाच्या जिल्हा सरचिटणीस मृणाल खेडकर, कर्जत तालुका उपाध्यक्ष वर्षा बोराडे, नेरळ शहर अध्यक्ष नीता कवाडकर, शिवसेना महिला आघाडी विभाग संघटक रोहिणी कासार, तसेच सुरेखा शिंदे, सीमा चित्रे, जयश्री मानकामे, मनीषा क्षीरसागर, माधवी क्षीरसागर, रसिका शिंदे, नेत्रा भोमिक, दर्शना बोराडे, प्रतिमा बारणे, पुष्पा जाधव, मथुरा वाघमारे, सविता वाघमारे यांनी खांडा भाग पिंजून काढला. यावेळी भाजपचे तालुका सरचिटणीस प्रवीण पोलकम, नेरळ शहर अध्यक्ष अनिल जैन, शहर चिटणीस राहुल मुकणे, हेमंत मिस्त्री, संभाजी गरुड, शिवसेना शहर प्रमुख रोहिदास मोरे, शहर संपर्कप्रमुख रोहिदास मोरे, उपशहर प्रमुख बंडू क्षीरसागर, ग्रामपंचायत सदस्य प्रथमेश मोरे, गटप्रमुख मनोज मानकामे, ज्येष्ठ कार्यकर्ते सुभाष पोतदार, संदीप म्हसकर, आदींसह युवासेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

नेरळ खांडा भागातील प्रचारफेरी दरम्यान मतदारांसमोर बोलताना भाजपच्या जिल्हा सरचिटणीस समिधा टिल्लू यांनी, केंद्र व राज्यातील भाजपप्रणित युती सराकरने महिलांसाठी विविध योजनांची अंमलबजावणी केली असून, महिला बचत गटांना आर्थिक स्वायत्तता मिळवून दिली, असे सांगून गरोदर महिलांना जादा सुट्टीदेखील याच सरकारने देण्यास सुरुवात केल्याचे टिल्लू म्हणाल्या.

युती सरकारने महिलांच्या सुरक्षेसाठी कडक कायदे केले आहेत, अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करणार्‍यांवर पोस्कोखाली कारवाई केली जाते, तर बलात्कार करणार्‍याला फासावर लटकविण्याचा कायदा झाला आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी वेगवेगळ्या हेल्पलाईन सुरू केल्या आहेत. महिलांमध्ये विश्वास निर्माण करण्याचे काम युती सरकारने केले आहे.

-मृणाल खेडकर,  जिल्हा सरचिटणीस, भाजप महिला मोर्चा

Check Also

केंद्र सरकार पाच वर्ष टिकेल -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत ः प्रतिनिधी मला या निवडणुकीत खूप काही शिकता आले. विरोधकांनी जाती जातीत तेढ निर्माण …

Leave a Reply