Breaking News

वीज कंत्राटी कामगारांच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा; तूर्तास उपोषण स्थगित

पनवेल : वार्ताहर, उरण : बातमीदार

महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे सोमवारी (दि. 28) खांदा कॉलनी येथील कामगार उपायुक्त कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्यात आले होते, परंतु वरिष्ठ पातळीवर सकारत्मक चर्चा झाल्याने तूर्तास हे बेमुदत उपोषण तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आले आहे. महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ (संलग्न – भारतीय मजदुर संघ) महावितरण वाशी मंडळतर्फे विविध मागण्यासंदर्भात पनवेल खांदा कॉलनी येथील कामगार उपायुक्त कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्यात आले होते, मात्र दुपारी कामगार उपआयुक्त विघ्नहर्ता कॉम्प्लेक्स, खांदा कॉलनी, पनवेल रायगड या कार्यालयात सहाय्यक कामगार आयुक्त शीतल कुलकर्णी, महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे पदाधिकारी, महावितरणचे कंत्राटी कामगार, ठेकेदारांचे प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक झाली. यात विविध विषयावर चर्चा झाली. या बैठकीला सहाय्यक कामगार आयुक्त शीतल कुलकर्णी, वाशी विभागाचे मॅनेजर जयश्री मराडे, पनवेल एमएसईबी डेप्युटी मॅनेजर सचिन घोडेकर, मे. ऑल ग्लोबल सर्विस प्रा. ली. या एजेन्सीचे प्रतिनिधी प्रशांत देठे, रोहित परब, नरेश मखीजा, महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे महामंत्री सचिन मेंगाळे, कार्याध्यक्ष उमेश अणेराव, रायगड जिल्हा सचिव कमाल खान, पनवेल सिटी कोषाध्यक्ष कल्पेश म्हात्रे, कामगार बाळकृष्ण ठाकूर, खांदेश्वर गोपनीय विभागाचे पोलीस अधिकारी सलीम तळवी आदी उपस्थित होते. कामगारांच्या विविध समस्या संदर्भात सहाय्यक कामगार आयुक्त शीतल कुलकर्णी यांनी ठेकेदारांना व ठेकेदार प्रतिनिधीना विविध सूचना केल्या. कामगारांच्या समस्या त्वरित सोडविण्याचे सूचना कुलकर्णी यांनी ठेकेदारांना केल्या. ठेकेदारांनी सर्व सूचनांचे पालन केले जाईल असे आश्वासन दिले. विविध विषयावर सकारात्मक चर्चा झाल्याने सदर बेमुदत उपोषण तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आले.

Check Also

खांदा कॉलनीतील ‘उबाठा’चे पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला लागलेली गळती सुरूच …

Leave a Reply