खांदा कॉलनी : जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा नागरिकांनी एकजूट होऊन निषेध केला आणि शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. या वेळी पनवेल महापालिका प्रभाग समिती ‘ब’चे अध्यक्ष एकनाथ गायकवाड, नगरसेवक संजय भोपी, नगरसेविका सीता पाटील, कुसुम पाटील, माजी उपनगराध्यक्ष गणेश पाटील, तसेच शांताराम महाडिक, सचिन गायकवाड, जितेंद्र माने, संतोष लोटणकर, अविनाश गायकवाड, गणेश हेडगे-पाटील आदी उपस्थित होते.