Breaking News

जेएनपीटीत आरटीसीजी क्रेनचा रोप तुटला; दोन कंटेनरचे नुकसान

उरण : प्रतिनिधी

उरणच्या जेएनपीटी बंदरातील 11 नंबरच्या आरटीसीजी क्रेनचा रोप तुटण्याची घटना सोमवारी (दि. 8) घडली. कंटेनर हाताळत असतानाच हा रोप तुटल्याने उचलला जात असलेला कंटेनर खाली असलेल्या दुसर्‍या कंटेनरवर आदळला. त्यामुळे दोन्ही कंटेनरचे नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे.  जेएनपीटीच्या अधिकारी वर्गाने या वृत्ताला दुजोरा देताना वातावरणात असलेल्या सोसाट्याच्या वार्‍यामुळे आरटीसीजी क्रेनने उचललेला कंटेनर एका बाजूस कलंडल्याने एकाच बाजूचे वजन जास्त प्रमाणात वाढून त्या बाजूचा रोप तुटल्याचे सांगण्यात आले. आरटीसीजी क्रेनमध्ये काही तांत्रिक अडचणी होत्या का, ही चौकशी करण्याबरोबरच अपघात घडण्याची घटना होताना त्यासंबंधीत आरटीसीजी क्रेनच्या देखभाल दुरुस्तीकडे जर कोणी दुर्लक्ष केले असेल, तर त्याची चौकशी होऊन त्यांच्यावर योग्य ती कारवाई व्हावी, अशी मागणी होत आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply