करंजाडे (पनवेल) : जम्मू-काश्मीरमधील पुलवामात जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेकडून झालेल्या हल्ल्यात सीआरपीएफचे सुमारे 40 जवान शहीद झाले. या शहीद जवानांना रविवारी प्रबुद्ध सामाजिक संस्था, ज्येष्ठ नागरिक संघ, फ्लॅट ओनर्स वेल्फेअर असोसिएशन आणि रहिवाशांनी एकत्र येऊन श्रद्धांजली वाहिली. या वेळी या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेधही करण्यात आला. त्याचे हे छायाचित्र.