पनवेल : वार्ताहर
पनवेल येथील दर्जेदार व विश्वसनीय आयुर्वेदिक औषधांची निर्मिती करणार्या पॅट फार्मास्युटिकल्स प्रा. लि. या कंपनीला नुकतीच 40 वर्षे पूर्ण झाली. याबद्दल मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. ‘पॅट’चे मालक मनोहर सदाशिव पटवर्धन व नयन मनोहर पटवर्धन यांनी एका प्रॉडक्टने या व्यवसायाला सुरुवात केली आणि आज 31 पेटंट प्रॉडक्ट व 100 हुन अधिक आयुर्वेदिक ग्रंथोक्त औषधांचा संच घेऊन आयुर्वेदाची अव्याहत सेवा सुरू आहे. आज त्यांची पुढची पिढी अर्थात त्यांचा मुलगा अभिषेक व सून अश्विनी हेही या व्यवसायात आवडीने लक्ष देत आहेत. नवी विस्तार योजना-नवी तंत्रदृष्टी हे ब्रीदवाक्य घेऊन कंपनीच्या पुढील वाटचालीची आखणी करण्यात आली आहे. सडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, कोकण म्हाडाचे सभापती बाळासाहेब पाटील, महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर, उपमहापौर विक्रांत पाटील, स्थायी समिती अध्यक्ष मनोहर म्हात्रे, नगरसेवक अनिल भगत, नगसेविका मुग्धा लोंढे, दर्शना भोईर, भाजप जिल्हा सरचिटणीस श्रीनंद पटवर्धन, शहर अध्यक्ष जयंत पगडे, संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, प्रदेश कार्यकारिणी सदस्य सी. सी. भगत, विस्तारक विश्वेश साठे, शहर सरचिटणीस अमरिश मोकल, युवा मोर्चा अध्यक्ष चिन्मय समेळ, उपाध्यक्ष प्रीतम म्हात्रे, नवीन पनवेल अध्यक्ष उदित नाईक, युवा नेते नीलेश पाटील, शिवसेना नेते चंद्रशेखर सोमण आदींनी पटवर्धन कुटुंबीयांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.