राजभवनावर केला सन्मान
रेवदंडा ़: प्रतिनिधी
काशीद पुल दुर्घटनेत अपघातग्रस्त कारमध्ये अडकलेल्या भायदे कुटूंबियांचे प्राण वाचवून असीम धैर्याचे दर्शन घडविणार्या श्री भायदे (वय 10) या मुलाचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते नुकताच राजभवनावर सन्मान करण्यात आला.
सागर मनोहर भायदे (ऐरोली, नवी मुंबई) हे 11 जुलै रोजी त्यांच्या मालकीच्या इर्टिगा कार (एमएच-43,ए-3920) ने कुटुंबियांसह मुरूड येथून नवी मुंबईकडे होते. काशीद येथील छोटा पूल पार करत असताना अचानक पूल कोसळला आणि इर्टिगा कार पाण्यात दहाबारा फुट खाली गटागंळ्या खात गेली. सागर भायदे यांचा दहा वर्षाचा मुलगा, श्री याने प्रसंगावधान दाखवून कारची पाठीमागील काच पायाने फोडली. व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने कारमधील सर्वांना बाहेर काढले होते.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजभवनावर श्री भायदे याचा यथोचीत सन्मान करून त्याच्या धैर्याचे कौतुक केले. या वेळी माजी खासदार संजीव नाईक यांच्यासह सागर भायदे व कुटूंबिय उपस्थित होते.