आमदार प्रशांत ठाकूर, तहसीलदार विजय तळेकर यांनी घेतली माहिती
पनवेल : रामप्रहर वृत्त
करंजाडे वसाहतीत दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि तहसीलदार विजय तळेकर यांनी करंजाडे वसाहतीच्या कोरोना बाधितांच्या आकडेवारीची माहिती घेत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्याकरिता काय उपाययोजना करता येईल याबाबत सिडकोचे आरोग्य अधिकारी डॉ. बी. एस. बाविस्कर यांच्यासह सिडको आरोग्य पथकाबरोबर चर्चा केली. त्यानुसार सिडको जिल्हा परिषद शाळेमध्ये सिडकोच्या वतीने लवकरच कोरोना बाधितांची अॅण्टीजेन तपासणी व लसीकरण केंद्र सुरू होणार आहे.
या वेळी करंजाडे सरपंच रामेश्वर आंग्रे, पोलीस पाटील कुणाल लोंढे, समीर केणी वडघर विभागीय अध्यक्ष, माजी सरपंच शशिकांत भोईर, राम पाटील, शशिकांत केणी, सचिन केणी, शशिकांत केणी, संजय परदेशी ग्रा. प. सदस्य, विजय केणी यांच्यासह सिडकोचे अधिकारी उपस्थित होते.
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी शासन स्तरावर विविध उपाययोजना राबविल्या जात आहे. पनवेल महापालिका व ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यातच सिडकोद्वारे नव्याने विकसित केलेली करंजाडे वसाहतीमध्ये एक लाख लोकसंख्या असलेल्या या वसाहतीमध्येदेखील बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे, मात्र कोरोनाचा वाढत असलेला प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासकीय स्तरावर विविध उपाययोजना करण्यात येत आहे. करंजाडे वसाहतीतील लक्षणे असलेल्या बाधितांना तपासणी किंवा लसीकरण करण्याकरिता थेट पनवेल गाठावे लागत आहे. त्यामुळे वसाहतीतील नागरिकांना गैरसोयीचा सामोरे जावे लागत आहे. त्याचबरोबर करंजाडे वसाहतीमध्ये सेक्टर 1 ते 6, तसेच आर-1 ते आर-5 येथील सिडको आरोग्य विभागाने माहितीनुसार गेल्या वर्षभरामध्ये 1495 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यामध्ये 1257 जणांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. तसेच 184 जण कोरोनावर उपचार घेत आहेत. त्याचबरोबर एकूण 32 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद सिडको आरोग्य विभागाकडे नोंदविण्यात आली आहे. तसेच दर दिवसाला सुमारे 25 ते 30 कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहे. त्यामुळे वसाहतीची वसाहतीची संख्या लक्षात घेता आमदार प्रशांत ठाकूर, तहसीलदार विजय तळेकर, यांनी सिडकोचे आरोग्य अधिकारी डॉ. बी. एस. बाविस्कर यांच्यासह अधिकारी व डॉक्टर यांच्याशी चर्चा केली. या वेळी या वसाहतीची कोरोना बाधितांची संख्या कमी करण्याच्या दृष्टीने काय उपाययोजजना करता येईल याबाबत चर्चा केली.
या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी येथील नागरिकांची याच ठिकाणी सिडकोकडून अॅण्टीजेन तपासणी व लसीकरण तसेच काँटँक्ट ट्रेसिंग या गोष्टी केल्या तरच संख्या कमी होईल, असे बाविस्कर यांना सांगितले. या वेळी बाविस्कर यांनी हा प्रस्ताव तयार करून करंजाडे जिल्हा परिषद शाळेमध्ये अॅण्टीजेन तपासणी व लसीकरण सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव तयार करू त्यानुसार येथे सिडकोच्या माध्यमातून तपासणी व लसीकरण सुरू होईल, त्याचबरोबर तहसीलदार विजय तळेकर यांनी सुद्धा बाविस्कर यांना कोरोनाबाधितांची संख्या कमी होण्याकरिता उपायोजना सुचविल्या.
कंटेन्मेंट झोनकडे पोलीसही लक्ष देतील
करंजाडे वसाहतीमध्ये कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ती संख्या कमी करण्याकरिता ज्या इमारतीत कोरोना बाधित रुग्ण आढळला असले, ती इमारती आरोग्य विभागाकडून कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित केली जाते. या वेळी काही बाधित किंवा त्यांचे नातेवाईक बिनधास्तपणे बाहेर फिरत असल्याने सुद्धा कोरोना वाढीला आमंत्रण देऊ शकते, त्यामुळे कंटेन्मेंट झोनमधील बाधित घरातच आहेत का बाहेर फिरतात याची माहिती घेण्याकरिता पनवेल शहर पोलीस ठाण्यातील पथक नेमण्यात यावे. यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांच्याशी चर्चा करून पथक नेमण्याची मागणी करू, असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले.
करंजाडे वसाहतीमध्ये कोरोना बाधितांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे वसाहतीमध्ये सिडकोच्या माध्यमातून लसीकरण व अॅण्टीजेन तपासणी लवकरच सुरू होणार आहे. त्यामुळे येथील कोरोनाची लक्षण असलेल्याना याठिकाणी अॅण्टीजेन तपासणी व लसीकरण करता येईल.
-विजय तळेकर, तहसीलदार, पनवेल