खोपोली : प्रतिनिधी
परप्रांतीयांची मूळगावी जाण्यासाठी होणारी फरफट पाहून खालापूरातील भाजप पुढे सरसावली आहे. तालुक्याचे अध्यक्ष बापू घारे, राकेश गव्हाणकर, अनिल उत्तेकर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी परप्रांतीयांना वैद्यकीय प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र आरोग्य कर्मचार्यांना सहाय्य केले. तसेच वावोशी हद्दीतील आदिवासी वस्तीत ग्रामपंचायतचे भाजपचे सदस्य महेश कडू तसेच जिल्हा परिषद माजी सदस्य राम वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी आदिवासी बांधवांना धान्यवाटप केले. या उपक्रमासाठी परिसरातीतील भाजपचे जिल्हा कोषाध्यक्ष सनी यादव, तालुका युवा अध्यक्ष प्रसाद पाटील यांनी सहाय्य केले होते. भाजपच्या या उपक्रमाचे परप्रांतीयांनी व आदिवासींनी आभार मानले. या वेळी तानाजी पाटील, हेमंत बामगुडे, दिनकर हातनोलकर, संतोष हातनोलकर, दीपक हातनोलकर उपस्थित होते.