पनवेल : रामप्रहर वृत्त
राज्यातील कोरोना संसर्ग आता आटोक्यात येत असून लसीकरण जेवढे जास्त होईल तेवढे कोरोना प्रतिबंध उपायांना बळ मिळेल या भावनेतून पनवेल येथील शुश्रूषा सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये लसीकरणाला सुरुवात झाली आहे. या लसीकरण केंद्राचे उद्घाटन पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाला नगरसेविका रूचिता लोंढे, नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील, माजी नगरसेवक संदीप पाटील, शुश्रूषा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक व प्रख्यात हृदय शल्यविशारद डॉ. संजय तारळेकर, पनवेल मॅटर्निटी व इन्फन्ट वेलफेयर लीगचे संचालक विजय लोखंडे, शुश्रूषा हॉस्पिटलचे बिजनेस हेड डॉ. मधुकर राठोड तसेच शेखर राव आदी उपस्थित होते.
पनवेल येथील जुन्या पोस्ट ऑफिसजवळ पटवर्धन रोडवर शुश्रूषा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये कोविशिल्ड लस 18 वर्षांवरील नागरिकांसाठी उपलब्ध असणार आहे. यामध्ये पहिल्या तसेच दुसर्या डोसचा समावेश आहे. या वेळी बोलताना सभागृह नेते परेश ठाकूर म्हणाले की, पनवेल शहरात उपलब्धतेनुसार लसींचा पुरवठा व लसीकरण केंद्रात वाढ करीत आहोत. लसीकरणामुळे मृत्युदर कमी होत असून कोरोना पॉझिटिव्ह रेट कमी होत आहे. लसीकरणानंतर पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांना जास्त त्रास होत नाही. त्यामुळे नागरिकांनी लसीकरण करण्यासाठी पुढे येणे गरजेचे आहे.
लसीकरण व कोरोनाविषयी बोलताना डॉ. संजय तारळेकर म्हणाले, शुश्रूषा हॉस्पिटलमध्ये लसीकरण केंद्राचे सिक्युरिटी चेक आणि वेटिंग एरिया, ओळख पटवण्यासाठी डेस्क, लसीकरण करण्यात येणारी रूम व ऑब्झर्वनशन रूम (निरीक्षण केंद्र) अशा चार भागांत विभाजन करण्यात आले आहे.
Check Also
कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये
पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …