Tuesday , February 7 2023

राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय मायबोली एकपात्री अभिनय स्पर्धा

‘अभानाप’ आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचा उपक्रम

पनवेल : रामप्रहर वृत्त
अखिल भारतीय नाट्य परिषद (अभानाप) पनवेल शाखा आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय आणि रायगड जिल्हास्तरीय मायबोली एकपात्री अभिनय स्पर्धा आयोजित
करण्यात आली आहे.
राज्यस्तरीय मायबोली एकपात्री अभिनय स्पर्धेतील प्रथम क्रमांकास 10 हजार रुपये, द्वितीय सात हजार, तृतीय क्रमांकास तीन हजार रुपये, उत्तेजनार्थ एकूण दोन पारितोषिके तर रायगड जिल्हास्तरीय अभिनय स्पर्धेतील प्रथम क्रमांकास पाच हजार, द्वितीय तीन हजार तर तृतीय क्रमांकास दोन हजार रुपये, उतेजनार्थ एकूण दोन पारितोषिके असणार आहेत.
मराठी भाषेत ही स्पर्धा होणार असून 15 वर्षांवरील स्पर्धकाला या स्पर्धेत सहभाग घेता येणार आहे. स्पर्धा दोन फेर्‍यांमध्ये होणार असून प्राथमिक फेरी ऑनलाइन तर अंतिम फेरी ऑफलाइन स्वरुपात पनवेलमध्ये होणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ऑडिशनचे व्हिडीओ 7 सप्टेंबर 2021पर्यंत परीूंररिीळीहरव.रिर्पींशश्रसारळश्र.लेा या  ईमेल पाठवावे. अधिक माहितीसाठी अमोल खेर (9820233349), किंवा गणेश जगताप (9870116964) यांच्याशी संपर्क साधावा. स्पर्धेचे यंदा दुसरे वर्ष असून या स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन अखिल भारतीय नाट्य परिषद पनवेल शाखेचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, उपाध्यक्ष तथा पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी केले आहे.

Check Also

भाजप नेते संजय भगत यांच्या वाढदिवसानिमित्त धान्यवाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप माथाडी ट्रान्सपोर्ट व सिक्युरिटी आणि महाराष्ट्र जनरल कामगार संघटना उपाध्यक्ष …

Leave a Reply