Breaking News

सीकेटी विद्यालयात ‘कॅलिडोस्कोप’

वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे

पनवेल : रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) इंग्लिश मीडियम माध्यमिक विभागाचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात मंगळवारी (दि. 7) झाले. या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे शिक्षणतज्ज्ञ बेहराम मोहता आणि संस्थेचे व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी कॅलिडोस्कोप या विषयावर विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
या सोहळ्यात विद्यालयाच्या वार्षिक अहवालाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले, तसेच शैक्षणिक वर्षात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. या वेळी अर्चना परेश ठाकूर यांची उपस्थिती लाभली. 

Check Also

भजनी मंडळांना मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते साहित्याचे वितरण

पनवेल : रामप्रहर वृत्तभजन परंपरेचे जतन, संवर्धन व्हावे आणि हा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहचावा या …

Leave a Reply