12 ते 17 वयोगटाला तीन डोस घ्यावे लागणार
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
केंद्र सरकारने 12 ते 17 वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी तयारी सुरू केली आहे. येत्या ऑक्टोबरपासून झायडस कॅडीलाची झायकोव्ह-डी ही लस देण्यात येणार आहे. मुलांना या लसीचे तीन डोस द्यावे लागतील. एनटीएजीआय प्रमुख एन. के. अरोरा यांनी या संदर्भात माहिती दिली आहे.
गंभीर आजार असलेल्या मुलांची यादी तयार करून त्यांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे, असेही अरोरा यांनी सांगितले.देशात कोरोनाविरोधात लढ्यात सहा लसी झाल्या आहेत. झायकोव्ह-डी ही लस 66.6 टक्के इतकी प्रभावी ठरली आहे.