Breaking News

आरोग्य विभागाच्या परीक्षांचा मुहूर्त अखेर ठरला!

मुंबई : आरोग्य विभागाच्या रद्द झालेल्या परीक्षेचा मुहूर्त अखेर ठरला. वर्ग क पदासाठी 24 ऑक्टोबर, तर वर्ग ड साठी 31 ऑक्टोबर रोजी परीक्षा होणार आहे. सर्व परीक्षार्थींना नऊ दिवस अगोदरच प्रवेशपत्र मिळणार आहे. ही परीक्षा आदल्या दिवशी रात्री अचानक स्थगित करण्यात आली होती. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागला. ऐन वेळेला परीक्षा रद्द झाल्यामुळे परीक्षा केंद्रावर पोहचलेल्या लाखो उमेदवारांना मनस्ताप आणि आर्थिक फटका सहन करावा लागला होता. अखेर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी (दि. 27) मुंबईत आरोग्य विभागाची बैठक घेतली जाईल, या बैठकीत या तारखा निश्चित केल्या जातील, असे सांगितले होते. त्यानुसार 24 ऑक्टोबर, तर वर्ग ड साठी 31 ऑक्टोबर रोजी परीक्षा होणार आहे.

Check Also

कळंबोलीत रंगणार कुस्त्यांचा आखाडा

विजेत्याला मिळणार पाच लाख रुपये व मानाची गदा पनवेल : प्रतिनिधीउदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय …

Leave a Reply