Breaking News

‘होपमिरर’तर्फे गरजूंना ब्लँकेट्स वाटप

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

हिवाळा ऋतू जवळ येत आहे. त्यात गरजु व वंचित मुलांना थंडीचा सामना करण्यासाठी नवी-मुंबईमधील होपमिरर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने ब्लँकेट्स वाटप उपक्रम हाती घेतला आहे. यामध्ये पनवेल, नवी मुंबई नजीकच्या रस्त्याच्या कडेला व फुटपाथवरील 100 गरजवंताना ब्लँकेट्सचे वाटप करून मायेची ऊब दिली आहे. स्वेटर वितरणानंतर त्याच्या चेहर्‍यावर समाधान

दिसून आले.

अनेक वंचित नागरिक कोणत्याही उष्णतेशिवाय फूटपाथ आणि रस्त्याच्या कडेला आसरा शोधत असतात व त्या ठिकाणी झोपतात. म्हणून त्यांची दखल घेऊन होपमिरर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने ब्लँकेट्स वाटप करण्यात आले. तर दिवाळीपूर्वी होपमिरर चॅरिटेबल ट्रस्टच्या टीमने नवी मुंबईतील विविध भागात 150 गरजू व गरीब मुलांना स्वेटरचे वाटप केले आहे.

आपण घरी असताना थंडीचा सामना करू शकतो, परंतू जे फुटपाथ वर राहतात त्यांना खर्‍या अर्थाने मायेची ऊब दिली पाहिजे, असे होपमिरर चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष रमजान शेख यांनी बोलताना सांगितले.

Check Also

अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर

मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …

Leave a Reply