Breaking News

कॅरम स्पर्धेत अश्रफ खान, अनिता कनोजिया विजेते

पनवेल ः रामप्रहर वृत्त
पनवेल तालुका क्रीडा संकुलात येथील एकवीरा कॅरम क्लब व रायगड कॅरम असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने कै. अनिल पाटील-शिंदे स्मृती चषक 2021 या जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. या स्पर्धेत पुरुष गटात अश्रफ खान, तर महिलांमध्ये अनिता कनोजिया यांनी अव्वल क्रमांक पटकाविला.
दोन दिवसीय कॅरम स्पर्धेच्या आयोजनासाठी भारतीय रेल्वे प्रशासकीय सेवेतील अधिकारी सुनील शिंदे यांनी पुढाकार घेतला होता. या स्पर्धेसाठी रायगड जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधून 120 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला, तसेच महिला गटामधूनही आठ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.
स्पर्धेत वैभव शिंदे यांनी दुसरा, तर सुरेश बिस्ट, अतिश कल्याणकर, श्याम घायवट, आशिष देशमाने, सचिन नाईक व उत्तम गोरेगावकर यांनी अनुक्रमे तिसरा चौथा, पाचवा, सहावा सातवा, आठवा क्रमांक प्राप्त केला आहे. महिला गटात निधी शहा यांनी द्वितीय क्रमांक मिळविला.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply