
खारघर : जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये शहीद झालेल्या भारतीय जवानांना गुरुवारी भाजपतर्फे सिडको अध्यक्ष तथा पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत आदरांजली अर्पण करण्यात आली. या वेळी शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.