खालापूर, खोपोली ः प्रतिनिधी
मुंबई-पुणे महामार्गावर बोरघाटातील टाटा सायमाळजवळ सोमवारी (दि. 17) लोणावळा येथून खोपोलीत नो एन्ट्रीमधून येणार्या टेम्पोची धडक युनोव्हा गाडीला बसली. या अपघातात 10 जण जखमी झाले आहेत.
या अपघातात अक्षय ओझा, हेमंत पाटोळे, श्रावणी शेंडे, निखिल धांदडे, कार्तिक सहरे, मधू कवरे, अश्विनी चापले, राहुल चापले, रिवान चापले, गोरक्ष सातपुते
जखमी झाले आहेत.
गंभीर जखमींना कळंबोली एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर किरकोळ जखमींवर खोपोली नगरपालिका रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Check Also
पनवेल शहरातील वाहनतळाचे भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते उद्घाटन
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास आता मदत मिळणार असून आमदार …