Breaking News

रायवाडीत रास्ता रोको आंदोलन; अलिबाग-मुरूड रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी

रेवदंडा : प्रतिनिधी

अलिबाग व मुरूड मुख्य रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी, या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते दिलीप जोग यांनी या रस्त्यावरील रायवाडी येथे रास्ता रोकोचे आंदोलन केले. जागोजागी खड्डे पडून अलिबाग-मुरूड या रस्त्याची   दुरवस्था झाली आहे. या रस्त्याची दुरुस्ती करावी, यासाठी दिलिप जोग यांनी 12 एप्रिल 2021 रोजी रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला होता. त्या वेळी सार्वजनिक बांधकाम खात्याने सदर रस्त्याची 31 ऑगस्ट 2021 पर्यंत दुरुस्ती व नुतनीकरण करण्याचे लेखी आश्वासन दिल्यामुळे जोग यांनी आपले आंदोलन स्थगित केले होते, मात्र सप्टेंबर, ऑक्टोबर महिना उलटून गेला तरीही सार्वजनिक बांधकाम खात्याने रस्ता दुरुस्तीच्या आश्वासनाची पूर्तता केली नाही. त्यामुळे अलिबाग-मुरूड रस्त्यावरील रायवाडी येथे सर्वात जुन्या खड्ड्यानजीक दिलीप जोग यांनी हातात माईक घेऊन रास्ता रोको आंदोलन केले.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply