Breaking News

तुर्भे बुद्रुक येथील घराला आग

पोलादपूर : प्रतिनिधी

तालुक्यातील तुर्भे बुद्रुक येथील साळवी बौद्धवाडीतील एका घराला गुरुवारी रात्रीच्या सुमारास शॉर्टसर्कीटमुळे आग लागल्याचे पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास निदर्शनास आल्यानंतर आग विझविण्याचे प्रयत्न सुरू झाले. मात्र, तोपर्यंत घरातील चीजवस्तू व कागदपत्रे आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याची माहिती पोलादपूर पोलिसांनी दिली.

तुर्भे बुद्रुक साळवी बौद्धवाडी येथे विलास सुधाकर साळवी यांचे घर असून ते नोकरीनिमित्त मुंबई येथे वास्तव्यास आहेत.  त्यांची बहिण उषा सागर कदम या घराची देखभाल करते. गुरूवारी रात्री उषा कदम या घर बंद करून संगिता विजय साळवी यांच्याकडे झोपण्यास गेल्या होत्या. पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास त्या घराकडे परत आल्या असता घरातून धूर येत असल्याने त्यांनी आरडाओरड करून लोकांना गोळा केले. उपसरपंच नरेश शेलार आणि ग्रामस्थांनी यावेळी महाड नगर परिषद आणि महाड औद्योगिक वसाहतीचा अग्निशमन बंब पाचारण करून आगीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, घरात असलेला फ्रिज, शोकेस, कपाट आणि टीव्हीसंच आदी मौल्यवान चीजवस्तू तसेच घराच्या पोटमाळ्याच्या लाकडी फळ्या जळून खाक झाल्या होत्या.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply