उरण : वार्ताहर
रशिया येथे 15 ते 21 एप्रिल रोजी होणार्या वर्ल्ड युनिफाइट चॅम्पियनशीपसाठी युनायटेड शोतोकन कराटे असोसिएशनच्या तीन खेळाडूंची निवड झाली आहे.
उरण तालुक्याील वेश्वी येथील पदाजी पांडुरंग मुंबईकर इंग्लिश मीडियम स्कूलमधील मानस मनीष पाटील (जांभुळपाडा) आणि प्रांजल सचिन पाटील (कळंबुसरे), तसेच जेएनपीटी येथील सेंट मेरी स्कूलची पलक राजन कडू (धुतूम) या विद्यार्थ्यांनी दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होऊन उत्तम कामगिरी केली. हे तीनही खेळाडू वर्ल्ड युनिफाइट स्पर्धेसाठी भारताचे प्रतिनिधित्त्व करणार आहेत. त्यांचे यूएसकेए अध्यक्ष मंदार पनवेलकर,
प्रशिक्षक सागर कोळी, सुरज टकले, स्वप्नाली सणस आदींनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.