Breaking News

नवी मुंबईत कोरोना मृत्यूदर नियंत्रणात

11 दिवसांत एकच मृत्यू

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रात कोरोना मृत्यूचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यात आरोग्य विभागाला यश येऊ लागले आहे.  डिसेंबर महिन्याच्या 11 दिवसांत फक्त एकाच रुग्णाचा मृत्यू झाला. नवी मुंबई महापालिकेने शून्य मृत्युदराचे उद्दिष्ट निश्चित करून कोरोनामुळे मृत्यू झाल्यास उपचारांमध्ये उणिवा राहिल्या का हेही तपासले जात आहे.

मृत्यू होण्याचे नक्की कारण काय, याविषयी तज्ज्ञांचे मत घेतले जात आहे. अनेक वेळा रुग्ण वेळेत उपचारासाठी दाखल न झाल्यामुळे मृत्यूचा धोका वाढल्याचेही निदर्शनास आले आहे. रुग्णास सहव्याधी असल्यास मृत्यूचा धोका वाढतो. मे महिन्यानंतर मृत्यूचे प्रमाण कमी होऊ लागले. सप्टेंबरपासून सरासरी एकपेक्षा कमी मृत्यूच्या घटना होऊ लागल्या आहेत. सप्टेंबरमध्ये 28, ऑक्टोबरमध्ये 23 नोव्हेंबरमध्ये 15 व डिसेंबरच्या पहिल्या 11 दिवसात फक्त एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

पालिकेने केलेल्या उपाययोजना नागरिकांमध्ये निर्माण झालेली जागरूकता व रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे मृत्यूचा आकडाही नियंत्रणात आल्याची माहिती वैद्यकीय तज्ज्ञांनी दिली. ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर चाचण्यांची संख्या वाढविली आहे. नियमांचे पालन न केल्यास पुन्हा रुग्णसंख्या वाढू शकते. त्यामुळे नागरिकांनी योग्य खबरदारी घेऊन रुग्णसंख्या व मृत्यूचे प्रमाण पुन्हा वाढणार याची दक्षता घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केलेय.

ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवरदक्षता

नवी मुंबई : ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्याचे निर्देश यापूर्वीच महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी आरोग्य विभागास दिलेले आहेत. टेस्टींगमध्ये वाढ व लसीकरणाला गती अशा दोन्हीप्रकारे गतीमान कार्यवाही केली जात आहे. त्यामध्ये घणसोली व नोसीलनाका या दोन्ही नागरी आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकार्‍यांकडून याविषयीची माहिती आयुक्तांनी घेतली.

परदेशातून आलेला कोणताही प्रवासी पॉझिटिव्ह आल्यास त्याठिकाणी घेण्यात यावी असे निर्देशित करतानाच आयुक्तांनी परदेशातून आलेल्या कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीचा जोपर्यंत ओमायक्रॉन टेस्टींग अहवाल येत नाही तोपर्यंत संशयित म्हणून शासकीय ट्रिटमेंट प्रोटोकॉल काळजीपूर्वक जपावा, असे आदेश आयुक्तांनी दिले. परदेशातून प्रवास करून आलेल्या कोणत्याही व्यक्तीस काही लक्षणे जाणवत असल्यास त्याला टेस्टींगसाठी घराबाहेर न बोलावता त्याच्या घरी जाऊन संपूर्ण काळजी घेत त्याचा स्वॅब टेस्टींगसाठी घ्यावा असेही निर्देश आयुक्तांनी दिलेत.

Check Also

‘सामना’ पन्नाशीचा झाला…

काही कलाकृतींचे महत्त्व व अस्तित्व हे कायमच अधोरेखित होत असते. ते चित्रपटगृहातून उतरले तरी त्यांचा …

Leave a Reply