Breaking News

खारघरमध्ये मसाज सेंटरचा सुळसुळाट; कारवाईची मागणी

पनवेल ः वार्ताहर

खारघर परिसरात गेल्या काही दिवसापासून विविध भागामध्ये मसाज सेंटरचा सुळसुळाट झाला असून या विरोधात खारघर पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी खारघरमधील जनता करीत आहे.

मसाज सेंटरच्या नावाखाली अनेक ठिकाणी ग्राहकांसोबत अश्लिल चाळे करण्याचे प्रकार सुरू आहेत. लॉकडाऊनच्या आदेशाचा भंग करून मसाज सेंटर सुरू आहे. काही दिवसापूर्वी खारघर पोलिसांनी अशा प्रकारच्या मसाज सेंटरची चौकशी केल्याचे समजते, असे असतानाही बिनदिक्कतपणे खारघर परिसरात मसाज सेंटर सुरू असून त्यांच्यापाठी कोणाचा आशीर्वाद आहे, असा सवाल केला जात आहे. तरी गुन्हे शाखेने नवी मुंबई परिसरात अशा मसाज सेंटरविरोधात कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. त्याचप्रमाणे कारवाई खारघर परिसरात बिनदिक्कतपणे व कोणतीही परवानगी न घेता सुरू असलेल्या बेकायदेशीर मसाज सेंटरवर कारवाई करावी, अशी मागणी खारघर मधील जनता करीत आहे.

Check Also

आदई डोंगरावर वृक्षारोपण अभियान

आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तपर्यावरण संवर्धनाचा संदेश देत आदई डोंगरावर …

Leave a Reply