खारघर : रामप्रहर वृत्त
भाजप खारघर-तळोजा मंडलच्या वतीने प्रभाग 3च्या सेक्टर 27 ते 36 मधील नागरिकांच्या मूलभूत समस्या निवारण्यासाठी तसेच मालमत्ता करासंदर्भातील अडचणी समजून घेण्यासाठी रविवारी (दि. 12) बैठक आयोजित करण्यात आली होती.
रामशेठ ठाकूर कॉलेज ऑफ कॉमर्स अॅण्ड सायन्स या महाविद्यालयात झालेल्या बैठकीत उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी, नगरसेवक हरेश केणी व सरचिटणीस किर्ती नवघरे यांनी नागरिकांच्या समस्या समजून घेत त्यावर समाधानकारक मार्गदर्शन केले.
या वेळी मंडल अध्यक्ष ब्रिजेश पटेल, नगरसेवक अभिमन्यू पाटील, शत्रुघ्न काकडे, प्रवीण पाटील, सरचिटणीस दीपक शिंदे, अल्पसंख्याक सेल प्रदेश चिटणीस मन्सूर पटेल, युवा मोर्चाचे अध्यक्ष विनोद घरत, साजिद पटेल, प्रभाकर जोशी, जयदास तेलवणे, सचिन वासकर, सुमित सहाय असे अनेक कार्यकर्ते पदाधिकारी तसेच विविध सोसायट्यांचे चेअरमन व सचिव उपस्थित होते.