Breaking News

मजनू चित्रपटात पनवेलची स्वेतलाना नायिकेच्या भूमिकेत

पनवेल : प्रतिनिधी

सोनाई फिल्म क्रिएशनच्या मराठी मजनू या चित्रपटात पनवेलची स्वेतलाना नायिकेच्या भूमिकेत चमकणार आहे. पोस्टर प्रसिध्द झाले असून लवकरच चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे पनवेलच्या सांस्कृतिक क्षेत्रात एक मानाचा तुरा खोवला जाणार आहे.

नवीन वर्षात एक हटके प्रेमकथा पेक्षकांच्या भेटीला येत असून सोनाई फिल्म क्रिएशनच्या मजनू या चित्रपटाद्वारे नवीन पनवेलमधील स्वेतलाना अहिरे ही नायिकेच्या भूमिकेत आपल्याला दिसणार आहे. नुकताच या चित्रपटाचा पोस्टर आणि मोशन पोस्टर प्रसिध्दीचा सोहळा दादर येथे झाला. या पोस्टरमध्ये नितीश चव्हाण हा रुबाबदारपणे घोड्यांच्यामध्ये धावत असून रोहन पाटील आणि स्वेतलाना एकमेकांसोबत दिसत आहेत. लक्षवेधी ठरलेल्या या पोस्टरमुळे या चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.

मजनूचे दिग्दर्शक शिवाजी दोलतांडे यांनी सांगितले की, हे एक ग्रामीणबाज असलेले निमशहरी भागातील कथानक असून हळुवार फुलणार्या प्रेम कथेसोबत प्रेक्षकांना उत्कंठावर्धक  सस्पेन्स पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात स्वेतलाना  सोबत  ’लागीर झाल जी’ फेम अभिनेता नितीश चव्हाण, रोहन  पाटील, सुरेश विश्वकर्मा, मिलिंद शिंदे, अरबाज शेख, प्रणव रावराणे, आदिती सारंगधर, माधवी जुवेकर व भाकी चव्हाण यांच्या भूमिका आहेत. हा चित्रपट लवकरच संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply