कळंबोली : रामप्रहर वृत्त
लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त कळंबोली येथील मध्यवर्ती कार्यालयामध्ये झालेल्या मोफत नेत्रचिकित्सा शिबिर व अल्पदरात चष्मे वाटप कार्यक्रमाचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी कळंबोली शहर अध्यक्ष रविनाथ पाटील उपाध्यक्षा बायजा बबन बारगजे, सरचिटणीस दिलीप बिष्ट, भटके विमुक्त आघाडीचे अध्यक्ष आबा घुटुकडे, बंजारा परिषदेचे प्रवक्ते मधुकर जाटोत, केशव यादव, रामदास महानवर, देविदास खेडकर, उपाध्यक्ष संतोष गायकवाड, नगरसेवक कमल कोठारी, दत्तात्रय भिसे, संदीप भगत, बालाजी दौंड, रवींद्र जाधव, कार्यालयीन चिटणीस जगदीश खंडेलवाल आदी उपस्थित होते.