मुरूड : प्रतिनिधी
मागील 30 वर्षांपासून दुर्ग संवर्धन व दुर्ग सहली घडविण्यात कार्यरत असलेल्या पुण्यातील कर्वेनगर येथील श्री दुर्गराज प्रतिष्ठानने 200 महिलांना मुरूड-जंजिरा येथील पद्मदुर्ग व अष्टविनायकातील पालीच्या गणपतीचे दर्शन घडविले. श्री दुर्गराज प्रतिष्ठान दरवर्षी गृहिणी तसेच नोकरी व्यवसायात व्यस्त असणार्या महिला व विद्यार्थिनी यांच्यासाठी एक दुर्ग व त्या परिसरातील देवस्थान यांचे दर्शन घडविण्याचे कार्य करते.
संगणकीय युगात विद्यार्थ्यांना ऐतिहासिक गडकिल्ल्यांची माहिती व्हावी यासाठी आम्ही या सहलींचे आयोजन करीत असल्याचे प्रतिष्ठानचे सदस्य ललित गव्हाणे यांनी सांगितले. या सहलीचे आयोजन प्रतिष्ठानचे सदस्य ललित गव्हाणे, रूपेश सकपाळ, चेतन धाडवे, निखिल बलकवडे यांनी उत्कृष्ट प्रकारे केल्यामुळे व पद्मदुर्ग किल्ल्याचे व पालीच्या गणपतीचे दर्शन घडविल्याबद्दल व माहिती दिल्याबद्दल सहलीमध्ये सहभागी झालेल्या पुणे कर्वेनगर येथील नगरसेविका लक्ष्मीताई दुधाणे यांनी प्रतिष्ठानचे विशेष आभार मानले.