Friday , September 29 2023
Breaking News

न्यूझीलंडमधील गोळीबारातून बांगलादेशचे खेळाडू बचावले

ख्राईस्टचर्च : वृत्तसंस्था

न्यूझीलंडमध्ये झालेल्या अंदाधुंद गोळीबारातून बांगलादेश क्रिकेट संघाचे खेळाडू थोडक्यात बचावले आहेत. सध्या बांगलादेशचे खेळाडू न्यूझीलंड दौर्‍यावर आहेत.

बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे प्रवक्ते जलाल युनिस यांनी दिलेल्या माहितीनुसार, खेळाडू बसमध्ये होते आणि मशिदीत जाण्याची तयारी करीत असतानाच गोळीबार झाला. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार गोळीबारात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. संध्याकाळच्या प्रार्थनेनंतर जेव्हा मशिदीत गर्दी होती तेव्हा हा गोळीबार करण्यात आला.

या थरारक प्रसंगानंतर बांगलादेश क्रिकेट संघाचा फलंदाज तमिम इकबाल याने ट्विट केले आहे की, गोळीबारातून संपूर्ण संघ बचावला आहे. अत्यंत भीतिदायक अनुभव होता. कृपया आमच्यासाठी प्रार्थना करा.

हल्ल्यातून वाचल्यानंतर मुश्तफिकूर रहीम यानेही ट्विट करीत अल्लाहचे आभार मानले आहेत. आम्ही खूपच सुदैवी असून, पुन्हा असे काही पाहण्याची इच्छा नाही, असे त्याने म्हटले आहे.

Check Also

पनवेलमधील रोजगार मेळाव्यात उमेदवारांना नियुक्तीपत्र प्रदान

केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांची प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये …

Leave a Reply