Breaking News

पनवेलमध्ये सावित्रीच्या लेकींचा पुरस्काराने सन्मान

पनवेल ः रामप्रहर वृत्त
सामाजिक, शैक्षणिक, कला, संस्कृती, क्रीडा अशा विविध क्षेत्रात गेली अनेक वर्ष उल्लेखनीय कार्य करणारे श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल आणि दैनिक लोकमत वृत्तपत्र यांच्या संयुक्त विद्यमाने पनवेल परिसरातील विविध क्षेत्रांमधील कर्तृत्ववान महिलांचा शुक्रवारी (दि. 30) आम्ही सावित्रीच्या लेकी 2024 पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. पनवेल शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात झालेल्या या सोहळ्यात कर्तृत्ववान महिलांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या सोहळ्यास माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, भाजप जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, ज्येष्ठ नेते वाय.टी. देशमुख, पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, दै. लोकमतचे उपाध्यक्ष निनाद देसाई, माजी महापौर डॉ. कविता चौतमोल, माजी उपमहापौर चारुशीला घरत, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, महापालिकेचे उपायुक्त कैलास गावडे आदी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ सन 1996पासून विविध क्षेत्रात कार्यरत असल्याचे सांगितले. सावित्रीबाई नसत्या, तर महात्मा फुलेंचे कार्य समोर आले नसते. त्यामुळे सावित्रीबाई फुलेंचे कार्य किती मोठे आहे याची अनुभूती येते. महिलांच्या सन्मानासाठी आम्ही नेहमीच पुढे आहोत. यापुढेही असेच पुढे राहू, असे अभिवचनही त्यांनी दिले.
दै. लोकमतने श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळासोबत राबवलेल्या या सोहळ्याचे मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी कौतुक केले. देशात प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला आपले कर्तृत्व गाजवत आहेत. आज देशाचे सर्वोच्च समजले जाणारे राष्ट्रपतीपद द्रौपदी मुर्मू सांभाळत आहेत. यातून महिलांचे कर्तृत्व सिद्ध होत असल्याचे त्यांनी सांगितले.
या सोहळ्यादरम्यान गणेश वंदना आणि ओडिसी नृत्य सादर झाले. ‘पाहिले न मी तुला’ या नाटकाच्या कलाकारांनी आपल्या नाटकाची तोंडओळखही उपस्थितांना करून दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन घाणेकर यांनी केले.

यांचा झाला सन्मान………………

डॉ. प्रज्ञा डोंगरगावकर, डॉ. रजनी मुल्लरपटण, डॉ. प्रभा दसीला, मनिषा बंड, डॉ. मानसी ठाकूर (वैद्यकीय शैक्षणिक विभाग), डॉ. जयश्री पी. पाटील, डॉ. शोभना पालेकर, कीर्ती समुद्रा, डॉ. शुभदा नील (वैद्यकीय विभाग), डॉ. निवेदिता श्रेयांस, डॉ. सीमा एन. कांबळे, वैशाली जगदाळे, ज्योत्स्ना भरडा, ओपन स्काय अकॅडमी, अनुष्का कोठेकर, राज अलोनी, डॉ. प्रणती टिळक (शैक्षणिक विभाग), प्रिया रातांबे, वर्षा कुलकर्णी (प्रशासन विभाग), कल्पना कोठारी, सिंधू नायर (मनोरंजन आणि सामाजिक सेवा विभाग), डॉ. सुप्रिया वाकचौरे (वैद्यकीय आणि सामाजिक सेवा विभाग), अपर्णा एस. कांबळे (पत्रकारिता शैक्षणिक विभाग), आस्मा सय्यद, वैशाली ठाकूर, तेजी घोष (व्यवसाय विभाग), डॉ. अश्विनी आर्ते (व्यवस्थापन शिक्षण प्रशासन विभाग), सीमा त्रिवेदी (व्यवसाय आणि साहित्यिक विभाग), अ‍ॅड. शिल्पा नागावकर (कायदेशीर शैक्षणिक सामाजिक सेवा विभाग), सायली सरक, मानसी पाटील (सामाजिक सेवा विभाग), सुषमा पोतदार (पाककला विभाग), रूपाली लांडगे (मायदेशी प्रशैक्षणिक विभाग), गीता गुप्ता (योगशिक्षिका विभाग), कल्पना म्हात्रे (जनशैक्षणिक विभाग), ऐश्वर्या महाडिक, स्वस्तिका घोष, स्नेहल पाटील (क्रीडा विभाग), हेमाली शेडगे (सांस्कृतिक विभाग), मोहिनी पांढरे (समाजसेवा-सनातन संस्था विभाग), वंदना पवार (समाजसेवा विभाग), विजया बाबर (मनोरंजन विभाग).

Check Also

अलेक्झांड्रा थिएटरची इमारत झाली 103 वर्षांची

आजच्या ग्लोबल युगातील डिजिटल पिढी मुव्हीज (आजची युवा पिढी चित्रपटाला मुव्हीज म्हणते) पाहण्यासाठी मल्टीप्लेक्स, मोबाईल …

Leave a Reply