Breaking News

खोपोलीत दुचाकी, सायकली जळून खाक

खालापूर, खोपोली : प्रतिनिधी

खोपोली चिन्मयनगर परिसरातील मालती हेरिटेज या इमारतीच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या दुचाकींना मंगळवारी (दि. 14) सकाळी 9.30च्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. यात सहा दुचाकी व दोन सायकली जळून खाक झाल्या

आग लागल्याचे वृत्त समजताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत पार्किंगमध्ये असलेल्या इतर सायकल्स व दुचाकींना वाचवण्यात यश मिळविले. आग नेमकी कशाने लागली याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली, पण गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन यंत्रणा, पोलीस कर्मचारी, अपघात ग्रस्त टीम ने मदतकार्य केले. अग्निशमन दलाच्या पथकाने आग आटोक्यात आणली मात्र तोपर्यंत संपूर्ण सहा दुचाकी जळून खाक झाल्या होत्या. पुढील तपास खोपोली पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply