Breaking News

माथाडींसाठी कामगारदिनी खूशखबर

ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पात रोजगाराची संधी

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते कार्यादेश सुपूर्द

कळंबोली : रामप्रहर वृत्त

भारतीय जनता माथाडी जनरल कामगार संघाच्या महाराष्ट्र राज्य नवी मुंबई कळंबोली येथील जुन्या टोळीला एल अ‍ॅण्ड टी कंपनीमार्फत मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रोजेक्टचे काम मिळाले आहे. हे काम माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रयत्नातून मिळाले असून, कामगार दिनाचे औचित्य साधून कामगारांना भेट म्हणून या कामाची वर्कऑर्डर देण्यात आली. त्याबद्दल सर्व कामगारांनी काल माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची भेट घेऊन अशीर्वाद घेतले.

या वेळी भारतीय जनता माथाडी जनरल कामगार संघाचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील, माथाडी नेते राजेंद्र बनकर, पनवेल महापालिकेचे नगरसेवक अमर पाटील, भाजप युवा मोर्चाचे कळंबोली शहर अध्यक्ष अमर ठाकूर, देवीदास खेडकर, बबन बारगजे, जमिर शेख, रामदास महानवर यांच्यासह पदाधिकारी, कामगार आणि मान्यवर उपस्थित होते.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply