खोपोली : प्रतिनिधी
धान्यवाटपात अनियमितता केल्याने खालापूर तहसील कार्यालयाच्या भरारी पथकाने मोहोपाडा येथील दुकान क्र. 1ला सील ठोकले आहे. त्यामुळे रेशन दुकानदारांचे धाबे दणाणले आहेत.
भरारी पथकाने खालापूर तालुक्यातील दुकानांना भेटी देण्यास सुरुवात केल्यावर मोहपाडा दुकान क्र. 1 येथील पाटील यांच्या दुकानाची तपासणी केली असता, अनियमितता व रेशन कार्डव्यतिरिक्त धान्य वितरित केल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पोलिसांसमक्ष पंचनामा करून दुकान सील केल्याचा अहवाल तहसीलदार यांना देण्यात आला आहे. या कारवाईत पुरवठा अधिकारी महेश पाटील व निरीक्षक सतीश शिंदे यांचा सहभाग होता. हा अहवाल तहसीलदार तो जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवतील, अशी माहिती मिळते आहे.