Breaking News

सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते आरडीपीएलचे उद्घाटन

रसायनी ः रामप्रहर वृत्त
रायगड डॉक्टर्स लेदर क्रिकेट असोसिएशनच्या वतीने मोहोपाडा येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटीस मार्केट्स क्रिकेट ग्राऊंडवर रायगड डॉक्टर प्रीमियर लीगचे (आरडीपीएल) आयोजन करण्यात आले आहे. या दोन दिवसीय क्रिकेट लीगचे उद्घाटन पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी (दि. 18) झाले.
या वेळी रायगड डॉक्टर्स लेदर क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. राजेश शिंदे, उपाध्यक्ष डॉ. घनश्याम पाटील, डॉ. सचिन नाईक, सचिव चंद्रकांत शिंदे, खजिनदार डॉ. संतोष जाधव, सहसचिव राजाराम हुलवान, सहखजिनदार डॉ. प्रशांत जगताप आदी उपस्थित होते.
कोविड काळात डॉक्टरांनी खूप काम केले. त्यांचीही फिटनेस कायम रहावी आणि त्यांना काही काळ विरंगुळा व्हावा यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेत सर्व डॉक्टरांची चार संघांत विभागणी करण्यात आली असून, या संघांमध्ये सामने खेळले जात आहेत.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply