

पनवेल : डेरीवली भाजपचे खजिनदार जयवंत शेळके आणि भाजपचे युवानेते रामदास महानवर यांचा वाढदिवस बुधवारी साजरा करण्यात आला. त्यानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी रामदास महानवर आणि जयवंत शेळके यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, पनवेल महपालिकेचे नगरसेवक अमर पाटील, राजेंद्र बनकर, बापू माने, ज्ञानदेव कदम, नितीन कुमकाले, प्रशांत रनवरे, उदय तरडे, तुषार कोकरे, विशाल माने, भाजपचे पळस्पे विभागीय चिटणीस रवींद्र शेळके, डेरवलीचे अध्यक्ष रूपेश शेळके, उपाध्यक्ष रूपेश शेंडे, सल्लागार अविनाश भोईर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.