Breaking News

कंपनीतील स्फोटाने खोपोली हादरली

सुदैवाने जिवीत हानी नाही, मात्र नागरिकांना जाणवला त्रास

खोपोली, खालापूर : प्रतिनिधी

खोपोली नगरपालिका हद्दीतील महिंद्रा सानियो लिमिटेड या स्टील उत्पादन करणार्‍या कारखान्यात ऑक्सिजन साठवणूक करणार्‍या टाकीचा अचानक स्फोट झाला. या स्फोटाने परिसरात खोपोली शहरात काही क्षणापुरते हादरे बसले. सुदैवाने कोणतीही जिवीत हानी झाली नाही, मात्र स्फोटामुळे उधळलेल्या पावडरचा त्रास जाणवल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले.

वासरंग गावच्या हद्दीतील स्टीलचे निर्मिती करणार्‍या महिंद्र सानियो लिमिटेड या कारखान्याच्या एसएमएस डिपारमेंटचा काही अंतरावरील ऑक्सिजन साठवणूक करणार्‍या टाकीमध्ये सायंकाळच्या सुमारास अचानक स्पोट झाला. या स्फोटाने वासरंग गावासह, खोपोली शहरही हदरले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात कंपनी प्रवेशद्वारावर परिसरातील ग्रामस्थांनी एकच गर्दी केली होती. परिस्थितीचे गांभीर्य पाहता याच वेळेस अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले होते. टाकीतील स्फोटाने कंपनीजवळच्या कॉलनीला जाणार्‍या रस्त्यावर पांढरा रंग पसरला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, सुदैवाने यात कोणीही जखमी नसल्याचे वृत्त आहे, मात्र व्यवस्थापनाततर्फे कुणीही माहिती देण्यात उपलब्ध नव्हते त्यामुळे काही काळ तणावाचे व भीतीचे वातावरण पसरले होते. परिस्थितीचे गांभीर्य पाहता विद्युत पुरवठा तत्काळ बंद करण्यात आला होता. तासाभरानंतर सुरू करण्यात आला. स्फोटाच्या हादर्‍याने परिसरातील घरातील भांडी पडण्याचा तसेच काचा तडकण्याचे प्रकार ऐकावयास मिळाले. परिस्थिती नियंत्रणाखाली असल्याचे सांगण्यात येत आहे.

सफेद भुकटी पावडरचे हवेत लोट

दरम्यान, या कंपनीत झालेल्या या स्फोटाने परिसरात सफेद भुकटी पावडरचे हवेत लोट पसरले. वासरंग सुभाष नगर व महिंद्रा रहीवाशी परीसरात प्रचंड हादरा बसला. रहीवाशी भुकंप झाल्याच्या भितीने घराबाहेर पडले. तर परीसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सुभाष नगर मार्गावर सफेद भुकटी पावडर पसरल्याने मार्ग सफेद झाले होते. घसा घवघवणे, दम लागणे, अशी लक्षणे जाणवत असल्याचे वासरंग गावातील रहीवाश्यांनी सांगितले.

Check Also

आमदार आपल्या दारी उपक्रमाचे तळोजात नागरिकांकडून स्वागत

पनवेल ः रामप्रहर वृत्ततळोजा फेज 1मध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या संकल्पनेनुसार आमदार आपल्या दारी हा …

Leave a Reply