Breaking News

बद्रुद्दिन दर्गाहचा उरूस रद्द

भाविकांनी गर्दी न करण्याचे आवाहन

पेण : प्रतिनिधी

पेण तालुक्यातील बद्रुद्दिन दर्गाह सुप्रसिद्ध असून सर्व धर्मातील भाविक येथे दर्शनाला व नवसपूर्तीकरिता येत असतात. रायगड, ठाणे, पनवेल, मुंबई, पुणे येथून मोठ्या प्रमाणत भाविक उरुसाला हजेरी लावतात.   पेण तालुक्यातील निधवली येथे हजरत बद्रुद्दिन शाह हुसैनी यांची दर्गाह शरीफ असून सुमारे 700 वर्षांपासून जानेवारी महिन्यात पाच दिवस येथे उरूस भरतो. यानिमित्ताने हजारो भाविक येथे येत असतात.

कोरोनाच्या तिसर्‍या लाटेच्या पार्श्वभूमीवर हजरत बद्रुद्दिन शहा हुसैनी दर्गा कमिटीच्या प्रशासनाने दिलेल्या आदेशानुसार या वर्षी होणारा उरूस रद्द केला आहे. त्यामुळे बद्रुद्दिन येथे दर्गाहवर येणार्‍या भाविकांनी व दुकानदारांनी दर्गाह परिसरात प्रवेश करू नये, तसेच शासनाचे पुढील आदेश येईपर्यंत दर्गाह परिसरात भाविकांना प्रवेश मनाई करण्यात आहे, अशी माहिती हजरत बद्रुद्दिन शहा हुसैनी दर्गा कमिटीचे इस्तियाक मुजावर यांनी पत्रकारांना दिली.

Check Also

सर्वांनी शिवरायांचे विचार जगायला हवेत -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तछत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती गव्हाण यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती …

Leave a Reply