Breaking News

दूध पिऊन करा नवीन वर्षाचे स्वागत

स्थानिक प्रकल्पग्रस्त संस्थेचा उपक्रम

नवी मुंबई : प्रतिनिधी

महापे येथील नवी मुंबई पोलीस आयुक्तालय, महापे वाहतूक शाखा, स्थानिक प्रकल्पग्रस्त रिक्षा चालक मालक संघटना व स्थानिक प्रकल्पग्रस्त संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी दूध वाटप करण्यात आले. दूध पिऊन नवीन वर्षाचे स्वागत करण्याचे या वेळी आवाहन करण्यात आले. 300 नागरिकांनी याचा लाभ घेतला. महापे येथील एमबीपी प्रवेशद्वारावरच दूध वाटपाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. दारू पिऊन नवीन वर्षाच्या आगमनाची प्रथा बंद करा, वाहतूक नियम पाळण्याचे व नवीन वर्षे अपघात विरहित जावा असा संकल्प करा असे आवाहन लाऊड स्पीकरद्वारे करण्यात आले. तर महापे गावातील तरुणांनी दारू न पिता दूध पिऊन नवीन वर्षाच्या  आगमनाचा संकल्प केला. या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या वेळी महापे वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक दत्तात्रेय किंद्रे, माजी नगरसेवक नामदेव डाऊरकर, माजी परिवहन सदस्य अशोक डाऊरकर, यशवंत पाटील, दगडू पाटील, स्थानिक प्रकल्पग्रस्त रिक्षा चालक मालक सामाजिक सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष संदीप कोंढाळकर, दिनेश घरत, मुकेश डाऊरकर, राजेश नाईक उपस्थित होते.

Check Also

वावंजे, मानपाडा येथे विकासकामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल विधानसभा मतदारसंघातील वावंजे निताळे आणि मानपाडा कातकरी वाडी येथे मंगळवारी (दि.28) …

Leave a Reply